बंद करून समस्या सुटणार .बाळकडू वृत्तसेवा शिर्डी : बंद केल्याने प्रश्न सुटेल अस मला वाटत नाही. मुख्यमंत्री उद्या याबाबत बैठक घेणार आहेत. बाबांच्या ग्रंथात सांगितल गेलय की बाबांनी जात, पात, धर्म, गाव, जन्मस्थान हे कोणालाही सांगितल नाही. महाराष्ट्रच नव्हे तर बाहेरील देशात अनेक साई मंदिर आहेत. तरी शिर्डीला जास्त लोक येतात. माझं विमान पार्किंग करायला जागा नाही यावरून येणाऱ्या भक्तांची संख्या समजते. बंद करून तोडगा काढण्यापेक्षा शांततेने चर्चा करून मार्ग काढावा. देशात अनेक मोठे वाद चालू आहेत. त्यामुळे साईंच्या वादाची भर त्यात टाकू नये, असे मत राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलंय. भुजबळांनी आज साई दरबारी दर्शनासाठी हजेरी लावली. त्यावेळी साई जन्मभूमीच्या वादावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. साईबाबा संकटात सापडू शकत नाही. सबका मालीक एक हा महामंत्र साईबाबांनी दिला. बंद करून प्रश्न सुटणार नाही. मुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक बोलावली आहे. दोन्हीकडंच ऐकून ते यावर भाष्य करतील. साईबाबांनीही म्हटलं होतं माझी जात शोधू नये. साईबाबा म्हणत होते मी सर्वांचा आहे सर्व धर्माचा आहे. बंद पुकारून तोडगा निघणार नाही. त्यामुळे शिर्डीकरांनी बंद मागे घ्यावा, अस आवाहनही भुजबळांनी केलय.
बंद करून समस्या सुटणार नाही, मख्यमंत्री या वादावर तोडगा काढतील - छगन भुजबळ