अमेरिकन आयोगाची अमित शाहंवर निर्बंध लादण्याची मागणी

•बाळकडू वृत्तसेवा नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झाले. या विधेयकावर आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी काम करणाऱ्या आयोगाने तीव्र आक्षेप घेतला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक हा चुकीचा निर्णय असून तो धोकादायक असल्याचे युनायटेड स्टेट कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजिअस फ्रीडमने (यूएससीआयआरएफ) म्हटले आहे. जर हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले तर अमेरिका सरकारने गृहमंत्री अमित शाह आणि अन्य प्रमुख नेतृत्त्वांवर निबंधाचा विचार केला पाहिजे, असे आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. अमेरिकेच्या णडउखठक आयोगाने म्हटलं की, नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यास अमेरिकेने अमित शहा आणि इतर प्रमुख नेत्यांवर निबंध घालावेत. दरम्यान, या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर आसाममध्ये निदर्शने केली जात आहेत. विद्यार्थ्यांकडून विरोध दर्शवताना अनेक ठिकाणी रास्तारोको करण्यात आला आहे. यात काही ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या आहेत. आसाममध्ये या विधेयकाच्या विरोधात १२ तासांचा बंदही पुकारण्यात आला आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे विधेयक लोकसभेत मंजूर होणे हे आमच्यासाठी तीव्र वेदनादायी आहे. जर हे विधेयक आता राज्यसभेतही मंजूर झाले तर अमित शहांवर निर्बंध घालण्याचा विचार अमेरिकी सरकारने केला पाहिजे. भारतातील अन्य महत्त्वाच्या नेत्यांवरही निबंध घातले गेले पाहिजेत, असेही आयोगाने म्हटले आहे.